“निसर्गवृत्ती’चे रक्षक बनले भक्षक !

  • बारामतीत वृक्ष चळवळीवर कुऱ्हाड : साईगणेशनगरमध्ये 35 वृक्षांची खुलेआमतोड

जळोची – ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी नगरपालिकेने “निसर्गवृती’ हा सेल्फी प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पातर्गत प्रतिवर्षी अकरा हजार वृक्ष लागवड करून ती जतन करण्यात येतात. मात्र नगरपालिका उद्यानाचे कर्मचारी विविध पर्याय शोधून वृक्ष चळवळीवर कुऱ्हाड चालवतात. नव्हे नगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी “निसर्गवृत्ती’चे रक्षकच भक्षक बनले असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.
बारामती नगरपालिकेने गेल्या दोन वर्षात “निसर्गवृती’ हा सेल्फी प्रकल्पातर्गत अंदाजे 35 हजार वृक्षांची लागवड करून वृक्षांचे जतन केल्याने हरित बारामती निर्माण झाली आहे. वृक्ष संपदा वाढीच्या ध्यासापोटी नगरपालिकेचा सेल्फी उपक्रम असलेला “निसर्गवृती’ प्रकल्पांतर्गत प्रतिवर्षी अकरा हजार वृक्ष लावण्याचा बेधडक कार्यक्रम राबवित आहे. या वृक्ष चळवळीत पालिकेच्या उद्यान विभागासह सामाजिक संस्थानी पुढाकार घेतल्याने ही वृक्ष चळवळ बहरली आहे. दुसरीकडे नगरपालिकेच्या सौजन्याने अनुसूचित व बिगर अनुसूचित अशा 35 वृक्षांची साईगणेशनगरमध्ये खुलेआम तोड करण्यात येते. निसर्गवृतीसाठी नगरपालिका अर्थसंकल्पात दोन कोटीची तरतूद करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने अनेक दानशूर व्यक्‍तींनी व काही सामाजिक संस्थानी नगरपालिकेला वृक्ष संवर्धनासाठी आठ टॅंकर दिल्याने भर उन्हाळ्यात ही दोन वर्षांत पालिकेने लावलेली वृक्षवल्ली वाचवणे शक्‍य झाल्याचे नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांनी सांगितले.

  • वृक्षांना ऍसिडचा धोका वाढला
    लाकुडतोडे वृक्ष तोडीला परवानगी मिळवण्यासाठी ड्रील करून झाडांच्या बुंध्यात ऍसिड टाकतात. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच ते झाड जळून जाते. हे निकामी झाड वाहतुकीला व नागरिकांना धोका असल्याच्या नावाखाली काढून टाकण्याचे आदेश उद्यान विभाग देते. अशा प्रकारे बारामतीत वृक्षवल्लींना ऍसिड माफियांचा व वखारमाफियांचा धोका वाढला आहे.
  • फांद्या छाटण्याच्या नावाखाली झाडांची कत्तल ?
    वाहतुकीच्या आड येणाऱ्या किंवा धोकादायक ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करणे हे नगरपालिकेचे काम असले, तरी प्रत्यक्षात मात्र नगरपालिका छाटणीच्या नावाखाली वृक्षतोड करत असल्याचा आरोप साईगणेश मधील रहिवाशांनी केला आहे. छाटणीच्या नावाखाली जवळपास सर्वच फांद्या तोडून केवळ बुंधाच शिल्लक ठेवण्यात आला आहे. छाटणी करणाऱ्या कामगारांना विचारले असता त्यांनी तेथून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. झाडे तोडली जात असताना उद्यान अधिकारी काय करतात, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. अधिकाऱ्यांना विचारले असता, चुकीच्या पद्धतीने व विनापरवाना छाटणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

अशा प्रकारे वृक्षतोड झाली असल्यास प्रभागातील क्षेत्रीय अधिकारी व उद्यान प्रमुख यांची ही जबाबदारी आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करू.
– पौर्णिमा तावरे, नगराध्यक्षा, बारामती नगरपालिका

लिंबांची झाडे तोडणे हे योग्य नाही, संबंधित जबाबदार अधिकारी व वृक्ष तोडणारे यांच्याकडून 500 स्वदेशी झाडे लाऊन घ्यावी. व त्यांचे त्यांनी दोन वर्षे संगोपन स्वखर्चातून करावे.
– महेश गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)