निसर्गरक्षण हा येणाऱ्या पिढीसाठीचा अनमोल ठेवा- सौ. वेदांतिकाराजे

सातारा – पर्यावरणाचा ऱ्हास आणि निसर्गाचा असमतोल यामुळे जगभरात अनेक समस्या निर्माण होत आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी, हिमवृष्टी, गारपीट, महापूर आदी समस्यांमुळे जिवीत व वित्त हानी होत असते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे, निसर्गरक्षण करणे फार महत्वाचे असून आजचे निसर्गरक्षण हा येणाऱ्या भावीपिढीसाठी अनमोल ठेवा असेल, असे मत कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्‍त केले.

शेंद्रे येथील एबीआयटी कॉलेजमध्ये पर्यावरणपूरक शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्येक शिक्षकाला एक झाड देवून स्वागत केले आणि तेच झाड कॉलेजच्या आवारात लावून पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी व प्रदूषणाला आळा घालण्याचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शिक्षक दिन उत्साहात साजरा केला.

प्राचार्य एस. यू. धूमाळ यांनी नैतिक मुल्यांच्या जबाबदारीचे महत्व पटवून दिले. प्रा. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्वत:वर विश्‍वास ठेवून काम केल्यास काहीही शक्‍य असल्याचे तसेच फोर मिनीटस ऑफ बॅरिअर याविषयी कथा सांगितली. प्रा. नलवडे यांनी आभार मानले. कार्यालयीन अधिक्षक भोसले यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)