निसरे घाटावर कोयना नदीकाठी आज महाआरतीचे आयोजन

आ. शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती

काळगाव – शासनाने रामजन्मभूमी अयोध्या येथे लवकरात लवकर राममंदीर उभारावे, याकरीता शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे हे किल्ले शिवनेरी गडावरील पवित्र माती मंगल कलशामध्ये घेवून आयोध्येला निघाले आहेत. दि. 24 नोव्हेंबर रोजी आयोध्या येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी आयोध्येत शरयु महाआरती घेण्यात येणार असून शिवसेना पक्षप्रमुख यांच्या विचारांना जाहीर पाठींबा देणेकरीता पाटण विधानसभा मतदारसंघाचे आ. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटण मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीने निसरे, ता. पाटण येथील कोयना नदीकाठच्या घाटावर सायंकाळी 5 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कनेते जयवंतराव शेलार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

-Ads-

पत्रकात म्हटले आहे की, रामजन्मभूमी अयोध्या येथे लवकर राममंदीर उभारावे यासाठी आजपर्यंत रथयात्रा निघाल्या. जय श्रीराम लिहलेल्या विटा गेलेल्या आपण पाहिल्या आहेत. राममंदीर बांधण्याचा अंतिम टप्पा गाठण्यासाठी राजमाता जिजाऊ व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आर्शिवाद घेवून येथील पवित्र माती कपाळाला लावून शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे हे किल्ले शिवनेरी गडावरुन 24 नोव्हेंबर रोजी आयोध्येला प्रस्थान करीत आहेत.

यादिवशी सायंकाळी आयोध्येत त्यांचे हस्ते शरयु महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्या या विचारांना पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने जाहीर पाठींबा देणेकरीता पाटण विधानसभा मतदारसंघाचे आ. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत निसरे, ता. पाटण येथील कोयना नदीकाठच्या घाटावर सायंकाळी 5 वाजता शरयु महाआरती घेण्याचे आयोजन पाटण मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. या महाआरतीस पाटण मतदारसंघातील शिवसैनिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जयवंतराव शेलार यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)