निष्ठावंताकडून भाजप नेत्यांची चिरफाड; भाजपमधील असंतोष आला उफाळून

पक्ष उमेदवारांच्या कोंडीसाठी निष्ठावंत सरसावले अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार

नगर: केडगावसह सावेडी उपनगरात उमेदवारी डावल्यात आल्याने संप्तत झालेल्या अनेक निष्ठावंतांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांची चांगलीच चिरफाड केली. कधी नव्हे ते आरोप या नेत्यांवर करण्यात आल्याने भाजपमधील असंतोष चांगलाच उफाळून आला असून या निष्ठावंतांना उमेदवारांची कोंडी करण्याची धोरण स्वीकारले आहे. पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरून नेत्यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

उमेदवारीवरून कोअर समितीचे खासदार दिलीप गांधी व ऍड. अभय आगरकर यांच्या आरोप करण्यात आले. केडगाव मंडल अध्यक्षांनी राजीनामे देखील दिले आहेत. याबाबत पक्षश्रेष्ठींनी अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे हा वाद आता चांगलीच धुमसत राहण्याची शक्‍यता आहे. विद्यमान नगरसेविका मनिष बारस्कर काळे यांना प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी नाकारण्यात आली. अर्थात यावेळी मनिषा काळे यांच्या ऐवजी त्याचे पती राजेंद्र काळे हे निवडणूक रिंगणात उतरणार होते. तशी तयारी त्यांनी केली होती. विशेष म्हणजे त्यांनीच उर्वरित उमेदवार शोधून त्यांना उमेदवारी देण्याचा आग्रह पक्षाकडे केला होता. त्यांना उमेदवारी पक्षाकडून देण्यात आली. परंतू काळे यांना डावलण्यात आले. त्यामुळे पक्षातील काळे यांनी थेट नेत्यांना लक्ष्य केले आहे. भाजप पक्ष म्हणून चांगला आहे. पण भाजपचे स्थानिक पदाधिकारी मनमानी करत पक्ष आपल्या घरची मालमत्ता असल्याचे वावरत आहेत. असे आरोप करून काळे यांनी नेत्यांना उमेदवारी नाकारल्याचे निकष जाहीर करा असे आव्हान दिले आहे.

नेत्यांबद्दल जाहीरपणे आरोप यावेळी झाले आहेत. केडगाव मंडलचे अध्यक्ष साहेबराव विधाते यांनी देखील ऍड. आगरकर यांच्या नावाचा उल्लेख करून आरोप केले आहे. गेली 25 वर्ष केडगावमध्ये भाजपला प्रतिकुल परिस्थितीत असतांनाही संघर्ष केला. केडगावमध्ये भाजप जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. कॉंग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे संसार उद्‌ध्वस्त केले. तरी कार्यकर्त्यांनी भाजप सोडली नाही. परंतू आज या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना धोका दिला आहे. त्याची किमत या नेत्यांना मोजावी लागेल, अशा शब्दात विधाते यांनी आपला संताप व्यक्‍त केला आहे. उमेदवारी नाकारण्यावरून स्थानिक नेत्यांवर आरोप झाले तरी एकाही नेत्याने त्याचा खुलास केला नाही. किंवा या कार्यकर्त्यांची समजूत काढली नाही. त्यामुळे पक्षातील असंतोष आणखी वाढला आहे.

सध्या तरी या निष्ठावंतांनी बंडाचा झेंडा हातात घेतला असून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षाचे उमेदवारी अडचणी येणार आहेत. या निष्ठावंताबरोबर पक्षाचे जुने कार्यकर्ते देखील आले असून त्यांच्या स्वतंत्र बैठक शहरात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या नेत्यांसह उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांनी वेळीच लक्ष घातले नाही तर त्यांचा पक्षाच्या उमेदवारावर परिणाम होणार आहे. त्यात या निष्ठावंतांना अन्य पक्षाच्या नेत्यांकडून बळ देण्यात येत आहे. हे बंडखोर निवडून येणार नसले तरी मताची विभागणी करून पक्षाच्या उमेदवाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याचा फायदा अन्य पक्षाच्या उमेदवारांना होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)