निषेधाच्या विविध घोषणांनी आस्मंत दुमदुमला

रेडा– इंदापूर शहरासह तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये मराठा समाजाच्यावतीने रस्ते आडवून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून स्वयंस्फूर्तीने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने सर्वत्र शुकशुकाट होता.
शहरात सकाळीच मराठा समाज बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समाज बांधवांनी “एकच मिशन मराठा आरक्षण’, “एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत, हातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा असलेले झेंडे घेऊन आंदोलन सुरू केले. तर दिवसभर शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले जात होते. तर इंदापूर शहर सकल मराठा समाजाच्या वतीने पंचायत समितीसमोर पुणे-सोलापूर रस्ता रोखून शासनाचा निषेध नोंदविला.
इंदापूर शहरातील व्यापारी, हॉटेल व सर्व प्रकारच्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. तर एसटी महामंडळाने सुरक्षेच्या कारणास्तव एसटी बसेस न सोडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, इंदापूरमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनालास सर्व समाजाने पाठिंबा देत बंदमध्ये सहभागी झाले होते. हा रास्तारोको तब्बल दोन तासांपेक्षा अधिकवेळ कडक उन्हात रास्तारोको करण्यात आले. त्यामुळे आपल्या बांधवांची तहान भागविण्यासाठी अरविंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विचार मंथन परिवाराच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अभिजीत तांबिले, अरविंद वाघ, राजेंद्र तांबिले, कैलास कदम, मंगेश पाटील, शेखर पाटील, बाळासाहेब ढवळे, शरद देवकर, बापुसाहेब जामदार, विशाल चव्हाण, गोरख शिंदे, ऍड. मनोहर चौधरी, ऍड. भारत जगताप, धरमचंद लोढा, डॉ.पंकज गोरे आदी उपस्थित होते. दरम्यान, युवतीच्या हस्ते सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले.

  • दोन रुग्णवाहिकांसाठी रास्ता केला खुला
    इंदापुरात सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्ता रोखला. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा हुतात्म्यांना प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळेस आलेल्या दोन रुग्णवाहिकांना मोर्चेकरांनी रस्ता खुलाकरून माणुसकीचे दर्शन घडविले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)