निशुल्क दर्शनपास विकणारा पोलिसांच्या ताब्यात

बंगळुरुच्या भाविकाला 100 रुपयात विकला दर्शनपास
शिर्डी – बंगळुरु येथील साईभक्‍ताला निशुल्क बायोमेट्रीक दर्शन पास शंभर रुपयांना विकणाऱ्याला सुरक्षारक्षकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
रामनवमी उत्सव आणि सलग सुट्ट्या यामुळेशिर्डीत साईभक्‍तांची गर्दी झाली होती. याचा गैरफायदा घेत बंगळुरु येथील साईभक्‍त नरेश रायकर यांना नाशिक येथील विवेक श्रीराम बनागरेयानेनिशुल्क दर्शनपास शंभर रुपयांना विकला.
हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी बनागरेला रंगेहात पकडून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी सोमेश्‍वर (बंगळुरु) येथील साईभक्‍त नरेश नागेश रायकर हेसाईसमाधी दर्शनासाठी गेट नंबर 3 जवळ आले. एकाने त्यांना थांबवून , मी तुम्हाला 100 रुपयात तत्काळ दर्शन करून देतो, असेम्हणत शंभर रुपयेघेतले.
दर्शनपास मिळाल्यानंतर रायकर गेट नंबर 3 वर असलेल्या सुरक्षा रक्षकाकडेगेले. सुरक्षारक्षकानेहा पास एका अपंग व्यक्‍तीच्या नावेअसल्याचेसांगितले. सुरक्षा रक्षक आणि रायकर हेपास देणाऱ्याचा शोध घेत असता तोपळून जात असल्याचे दिसले. त्याचा पाठलाग करत या भामट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रायकर यांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी विवेक श्रीरामजी बनागरे (वय 52, रा. साताबाईचाळ, वाघाडी, नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)