निशिथ रहाणे, आर्यन हूड, सानिका भोगाडे, अपर्णा पतैत, आमोद सबनीस मुख्य फेरीत

एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धा

पुणे – मुलांच्या गटात निशिथ रहाणे, आर्यन हूड, आमोद सबनीस, अंशित देशपांडे, सौमिल चोपडे यांनी, तर मुलींच्या गटात सानिका भोगाडे, माही शिंदे अपर्णा पतैत यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन 12 व 14 वर्षांखालील टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील अंतिम पात्रता फेरीत 14 वर्षांखालील मुलींच्या गटात सानिका भोगाडेने रिशिता अगरवालचा 6-0, 6-1 असा, तर माही शिंदेने रिहाना रॉड्रिगेसचा 6-1, 6-0 असा सहज पराभव केला. अपर्णा पतैतने तिस्या रावतवर 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

बारा वर्षांखालील मुलांच्या गटात आमोद सबनीसने आदित्य सुर्वेचा टायब्रेकमध्ये 6-2, 6-7 (2), 7-6 (4) असा पराभव केला. सौमिल चोपडेने देवब्रत बॅनर्जीचा 6-3, 6-2 असा तर, अंशित देशपांडेने आदित्य यादवचा 6-1, 6-0 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. चौदा वर्षांखालील मुलांच्या गटात आर्यन हूडने पार्थ देवरूखकरला 6-1, 7-5 असे नमविले. निशिथ रहाणे याने ईशान नाथनचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

     सविस्तर निकाल –

अंतिम पात्रता फेरी – 14 वर्षांखालील मुले – निशिथ रहाणे वि.वि. ईशान नाथन 6-0, 6-0; योहान चोकनी वि.वि. शर्विल पाटील 6-0, 2-6, 6-2; आर्यन हूड वि.वि. पार्थ देवरूखकर 6-1, 7-5;

12 वर्षांखालील मुले – सौमिल चोपडे वि.वि.देवब्रत बॅनर्जी 6-3, 6-2; अंशित देशपांडे वि.वि. आदित्य यादव 6-1, 6-0; करण रावत वि.वि. पृथ्वीराज बारी 6-3, 6-3; अभिराम निलाखे वि.वि.अथर्व रुईकर 6-1, 6-2; आमोद सबनीस वि.वि. आदित्य सुर्वे 6-2, 6-7(2), 7-6(4);

14 वर्षांखालील मुली – माही शिंदे वि.वि. रिहाना रॉड्रिग्ज 6-1, 6-0; अपर्णा पतैत वि.वि. तिस्या रावत 6-2, 6-3; सानिका भोगाडे वि.वि. रिशिता अगरवाल 6-0, 6-1; ईशान्या हतनकर वि.वि. सिद्धी खोत 6-3, 6-0; आशी छाजेड वि.वि. चिन्मयी बागवे 6-2, 7-5.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)