निवृत्त शिक्षकांसाठी भवन बांधा

राजगुरूनगर- खेड तालुक्‍यातील निवृत्त शिक्षकांसाठी शिक्षक भवन बांधण्याची मागणी खेड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारणसभेत करण्यात आली. खेड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष मा. ल. सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. 31 सप्टेंबर) पार पडली, त्यावेळी सर्वानुमते वरील मागणी करण्यात आली. याप्रसंगी शहाजीराव ढेकणे, सुभाष कुर्लेकर, बापू घाटकर, शांताराम घुमटकर, प्रताप आहेर, सचिव सु. बा. वेहळे, सहसचिव शां. रा. मते, नानासाहेब लोंढे, भास्कर लोंढे आदी उपस्थित होते. शहाजीराव ढेकणे म्हणाले की, निवृत्त शिक्षकांनी यापुढे आनंदी राहून मानसिक आरोग्य जपावे. जीवनव्यवहारात बदल होत आहेत, त्यांना सकारात्मकपणे सामोरे जायला हवे, असे त्यांनी सांगितले. मा. ल. सांडभोर म्हणाले की, दरमहीन्याच्या 5 तारखेला पेन्शन मिळावी, इतर बिले सहा महिन्यांच्या आत मिळावी मात्र, ती वेळेत मिळत नाही यासाठी एकीचे बळ दाखवावे लागेल. फरकाबिले, फॅमेली पेन्शन, गटविमा, निवृत्तीनंतर 15 वर्षानंतरची पेन्शन आदींसाठी वेळप्रसंगी आंदोलन करावे लागेल. यावेळी 75 वर्षे पार केलेल्या शिक्षक सभासदांचा सत्कार करण्यात आले. प्रास्ताविक ब. ल. पावडे, सूत्रसंचालन नानासाहेब लोंढे तर ल. रा. नाणेकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)