निवृत्त पोलीस निरीक्षकाला बोगस अधिकाऱ्याचा गंडा

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी)
तुमच्या बॅंकेतून बोलतोय, तुमचे अकाऊंट अपडेट करायचे आहे, असे म्हणून निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या बॅंक खात्यातून 58 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. निवृत्त पोलीस निरीक्षक मोहन एकनाथ नलवडे (वय 75 , रा. कूपर कॉलनी, सदरबझार) यांना सोमवारी सायंकाळी एका अनोळखी मोबाईल नंबरवरून कॉल आला. मी तुमच्या बॅंकेतून बोलतोय, तुमचे अकाऊंट अपडेट करायचे आहे, त्यासाठी तुमचा अकाऊंट नंबर, एटीएम नंबर मागितला. नलवडे यांनी त्या व्यक्तीला सर्व माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबरही त्या अनोळखी व्यक्तीला सांगितला. त्यानंतर मंगळवारी त्यांच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खात्यातून 58 हजार रुपये काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला. नलवडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक डाळिंबकर करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)