निवृत्तीवेतन अर्जावर सेल्फी नको 

नवी दिल्ली -निवृत्तीवेतन अर्जावर सेल्फीचा वापर करण्यात येऊ नये असे कामगार मंत्रालयाकडून केंद्र सरकारच्या निवृत्त होण्यास आलेल्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. निवृत्तीवेतन अर्जावर कशा प्रकारे फोटो वापरण्यात यावा यासाठी विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले. कृष्णधवल छायाचित्राचा वापर करण्यात येऊ नये. फोटोचा आकार आणि स्वाक्षरी यांसाठी देण्यात आलेल्या जागेचा पूर्णपणे वापर करण्यात यावा असे सांगण्यात आले.

केंद्रीय नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1972 नुसार निवृत्तीवेतनासाठी अर्ज करताना केंद्रीय कर्मचाऱयांनी आपल्या भागीदारासह संयुक्त अथवा अलगपणे तीन प्रति जोडाव्यात असा नियम आहे. कर्मचाऱयाने निवृत्त होण्यासाठी आठ महिने अगोदर प्रमुख कार्यालयातून अर्ज घेत तो भरून देणे आवश्‍यक आहे. या फोटोमध्ये काळया रंगाचे बॅकग्राऊंड अथवा गणवेश, चष्माचा रंग गडद काळा असता नये आणि डोळे स्पष्टपणे दिसावेत असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)