निवृत्तीनंतरही चालक-वाहकांची कृतज्ञता

राजगुरुनगर-राजगुरूनगर एसटी आगारातील चालक उमेश बोंडे यांनी आपल्या निवृत्तीवेतनातील चाळीस हजार रुपयांची रक्कम कर्मचारी विश्रांतीगृहात कर्मचाऱ्यांना आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सौरउर्जा प्रकल्प बसविण्यासाठी स्थानकप्रमुखांकडे सुपूर्द केले.
राजगुरुनगर एसटी आगारातील चालक उमेश बोंडे व वाहक बाळासाहेब ढमढेरे यांच्या सामाजिक कार्याच्या कृतज्ञता सन्मान कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच राजगुरुनगर आगारात करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपिठावर नायब तहसिलदार माणिकराव राजेनिंबाळकर, पत्रकार किरण खुडे, शब्दब्रम्ह ऍकॅडमीचे सुनिल थिगळे, आगार प्रमुख उज्वला टाकळकर, कल्याणशिल देखणे, ज्ञानेश्वर वाडेकर, कैलास चौधरी, संजय सुर्वे उपस्थित होते.
यावेळी किरण खुडे म्हणाले कि, श्रद्धा आणि निष्ठेने काम करणाऱ्या सकारात्मक वृत्तींचा सेवाभाव समाजाला हवा असतो, त्यामुळे समाज त्यांना केव्हाही अलीप्त होऊ देत नाही. एसटीच्या पायरीला नमस्कार करुन दररोज कर्तव्याचा आरंभ करणारे आणि सौजन्यपूर्ण सेवा देणारे एसटीचे कर्मचारी समाजाचे खरे नायक आहेत; परंतु आपण राजकीय व्यक्तींपुढे यांना गौण समजतो हा आपला सामाजीक अपराध आहे. असे सामाजिक नायक समाजाला विश्वबंधूत्वाचा आशय देत असतात. माथी भडकावून सर्वसामान्यांची एसटी बस जाळणारे कधीही समाजसेवक होऊ शकत नाही; तर माझी गाडी, माझा डेपो, माझा प्रवासी असे समाजभान जपणारेच खरे नायक असतात. अशा व्यक्तींना समाज कधीही सेवेतून निवृत्ती देत नाही.
सुनिल थिगळे म्हणाले, हा कृतज्ञता सोहळा नसून नवीन आयुष्याचा स्वागत सोहळा असे म्हणावे. यावेळी कल्याणशिल देखणे, माणिकराव राजेनिंबाळकर, उज्वला टाकळकर, ज्ञानेश्वर वाडेकर, रामदास चव्हाण, दिलीप तापकीर, गोविंद वर्ये, कैलास चौधरी, दत्तात्रय शेटे, मंजीरकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सुर्वे यांनी केले. बाळासाहेब ढमढेरे, उमेश बोंडे यांनी महामंडळ व प्रवासी यांच्याविषयी भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन दिलीप चौधरी यांनी तर दत्ता गभाले यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)