निवृत्तीनंतरच्या जीवनशैलीचे आर्थिक नियोजन (भाग-२)

बदलत्या काळात प्रत्येकाने विविध म्युच्युअल फंड, शेअरमधील दीर्घकालिन गुंतवणूक या साधनांचा सुरवातीपासून प्रभावीपणे वापर करून स्वतःला निवृत्तीनंतर त्याच दिमाखात जगता येईल अशा पद्धतीने नियोजन केले पाहिजे. अर्थात ही गोष्ट जितकी लवकर सुरु होईल तितकी तुमची निवृत्तीनंतरची पूंजी भरभक्कम होईल.

निवृत्तीनंतरच्या जीवनशैलीचे आर्थिक नियोजन (भाग-१)

निवृत्तीनंतरच्या आयुष्यात नियमितपणे पैसे हातात येत रहावेत यासाठी गुंतवणुकीची काही साधने –

-Ads-

म्युच्युअल फंड योजना  – निवृत्तीनंतर नियमित प्राप्ती होण्यासाठीचा एक उत्तम मार्ग म्हणजे म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये दरमहा गुंतवणूक करत राहणे आणि सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅनचा (एसडब्लूपी) पर्याय निवडणे. एसडब्लूपी म्हणजे एसआयपीच्या विरुद्ध प्रक्रिया. एसआयपीमध्ये तुम्ही दरमहा किंवा ठराविक कालवधीत नियमितपणे गुंतवणूक करत राहता. एस़डब्लूपीमध्ये तुम्हाला गुंतवलेल्या निधीतून दरमहा किंवा ठरलेल्या कालावधीत नियमितपणे पैसे काढता येतात. जेणेकरून निवृत्त झालेल्या व्यक्तीला दरमहा हातात ठराविक रक्कम मिळू शकते. निवृत्तीनंतर जोखिम उचलण्याची व्यक्तीची क्षमता कमी होते. त्यामुळे आधी जोखिम स्वीकारून गुंतवलेली रक्कम कित्येक पटीच्या परताव्यात वाढलेली असते आणि आता एसडब्लूपीद्वारे ती तुम्हाला टप्प्याटप्प्याने नियमितपणे परत मिळू लागते. शिवाय मुदत ठेवींच्या तुलनेत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही कराच्या दृष्टीने लाभदायी ठरते.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) – अगदी 2018 च्या सुरवातीपर्यंत शेअर बाजारातील एक वर्षांच्या गुंतवणुकीनंतरच्या परताव्यावर कोणताही कर नव्हती. परंतु आता कररचनेत बदल झाले आहेत. त्याउलट पीपीएफ हे असे गुंतवणुकीचे साधन आहे ज्यातील गुंतवणूक म्हणजेच मूळ मुद्दल आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर आकारला जात नाही. तुम्ही पीपीएफमध्ये नोकरीच्या सुरवातीपासून दरमहा गुंतवणूक करत राहिलात तर चक्रवाढ व्याजाच्या अद्भुत परिणामामुळे 15 ते 20 वर्षांच्या काळात तुमच्या खात्यात आश्चर्यकारक रक्कम जमा होते. निवृत्तीसाठी तुम्ही म्युच्युअल फंडात आणि शेअर बाजारात थेट गुंतवणूक करत असाल तर गुंतवणुकीतील डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच गुंतवणुकीच्या विविध साधनांचा वापर म्हणून पीपीएफमध्ये देखील गुंतवणूक करावी.

न्यू पेन्शन स्कीम (एनपीएस) – निवृत्तीनंतर जास्तीत जास्त व्यक्तींनी निवृत्तीवेतन मिळावे यादृष्टीने या योजनेची सुरवात करण्यात आलीआहे. प्राप्तीकर कायद्याच्या 80 सीसीडी कलमांतर्गत या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हांला रू. 50 हजारपर्यंत करसवलत मिळू शकते. त्यामुळे प्राप्तीकर कायद्याच्या 80 सी अंतर्गत गुंतवणूकदाराला दीड लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळू शकते. एनपीएस शेअर बाजाराशी निगडीत योजना आहे आणि गुंतवणूकदार ज्या फंडांची निवड करतो त्या फंडांच्या कामगिरीवर त्याला मिळणारा परतावा अवलंबून असतो. फंड मॅनेजरने आठ विविध योजनांची निवड केलेली असते त्यातून सरकारी रोखे, डेट फंड किंवा इक्विटी अशा योजनांची निवड करण्याचा पर्याय गुंतवणूकदारासमोर असतो.

– चतुर

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)