निविदेतील फरकाची रक्कम अनामत म्हणून घ्यावी

स्थायी समितीत प्रस्ताव

पुणे – महापालिकेच्या विकासकामासाठी राबविण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेत कमी दराने काम घेणाऱ्या ठेकेदाराकडून कमी दराने आलेली फरकाची रक्कम अनामत रक्कम म्हणून ठेऊन घ्यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी हा प्रस्ताव दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये विविध प्रकारची विकासकामे केली जातात. ही कामे करण्यापूर्वी पालिकेकडून या कामाचे पूर्वगणक पत्र संबंधित विभागाच्या अभियंत्याकडून केले जाते. त्यानुसार संबंधित कामासाठी निविदा रक्कम निश्‍चित केली जाते.

प्रामुख्याने रस्ते, विद्युत, ड्रेनेज, पाणी या कामांचा समावेश असतो. यासाठी राबविण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेत खासगी ठेकेदार सहभागी होतात. वास्तविक पाहता एखादया कामाचे पूर्वगणनपत्रकापेक्षा काम मिळविण्याच्या स्पर्धेतून खाजगी ठेकेदार ही कामे 30 ते 35 टक्के कमी रकमेने करण्यास तयार असतात. परिणामी, हे काम मिळविण्यासाठी कमी केलेल्या रकमेची भरपाई म्हणून संबंधित ठेकेदाराकडून कामाचा दर्जा हा निकृष्ट होण्याची संभावना असते. त्यातच गेल्या काही वर्षातील शहरात झालेली भविष्यात कामे पाहता या कामात त्रुटी, दुरूस्ती करावयाची झाल्यास संबंधित ठेकेदाराकडून ती केली जात नाही व यामुळे भविष्यात होणाऱ्या दुर्घटनांना महानगरपालिकेस जबाबदार ठरविले जाते. ही बाब लक्षात घेऊन ठेकेदार जेवढी रक्कम कमी दराने भरेल ती रक्कम अनामत रक्कम म्हणून घेण्यात यावी असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. तर संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केल्यानंतर त्याला निश्‍चित करून दिलेला देखभाल दुरुस्तीच्या कालमर्यादेत त्या कामामध्ये सभासदाने अथवा कोणत्याही नागरिकांनी तक्रार केल्यास जमा असलेल्या डीडीच्या रकमेतून दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे. त्यामुळे ठेकेदाराकडे पाठपुरावा न करता दुरुस्तीचे काम ताबडतोब करण्यास मदत होईल. तसेच विकासकामे करतानाच ठेकेदारांकडून चांगल्या दर्जाची केली जातील व नागरिकांच्या निधीचा दुरुपायोग होणार नसल्याचेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)