निविदा भरण्यावरून दोन ठेकेदारांमध्ये हाणामारी

वडूजमधील प्रकार : नागरिकांमध्ये खुमासदार चर्चा

वडूज, दि. 8 (प्रतिनिधी) – ऑनलाईन निविदा भरण्यावरून दोन ठेकेदारांमध्ये सोमवारी फ्री-स्टाईल हाणामारी झाली. या प्रकाराची वडूजमध्ये दिवसभर शहरात सुरू होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ई – निविदा अंतर्गत बांधकाम विभाग अतिरिक्त मुख्य अधिकारी सातारा व जिल्हा परिषद यांच्याकडील रस्ते विकास व मजबूतीकरण या लेखा शिर्षकाखाली तालुक्‍यात या विभागाच्या माध्यमातून 21 कामे मंजूर आहेत. त्याबाबत निविदा भरण्याचा सोमवारी अंतिम दिवस होता. त्यामुळे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येथील एका ऑनलाईन निविदा भरण्याच्या ठिकाणी काही ठेकेदार आले होते. यामध्ये एजन्सी वापर व प्लॅन्ट वापराच्या दाखल्यावरून प्रस्थापित ठेकेदार व नवीन ठेकेदार यांच्यामध्ये कामे टाकण्यावरून धुसफूस सुरू होती. एका ठेकेदाराने यातील पाच कामे मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव केली होती. निविदा भरताना ऐनवेळी प्लॅन्टधारक एजन्सी देण्याबाबत आडमुठपणाची भूमिका घेऊ लागले. त्यामुळे संतापलेल्या एका ठेकेदाराने दुसऱ्या ठेकेदाराच्यात धक्काबुक्की झाली. अचानक सुरू झालेल्या या मारहाणीची चर्चा दिवसभर सुरू होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 50 लाखांच्या आतील कामाला हॉट मिक्‍सिंग प्लॅन्टची अट शासनाने रद्द केल्याचे परिपत्रक काढले असल्याचे समजते. परंतु जिल्हा परिषदेच्या या निविदांमध्ये या अटीचा समावेश करून निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. यामुळेच ही घटना घडल्याची चर्चा आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)