निविदा प्रक्रियेत अडकली ड्रोन खरेदी

वनक्षेत्राच्या सुरक्षा आणि देखरेख प्रक्रियेत अडथळे

पुणे – वनक्षेत्राच्या सुरक्षेबरोबरच वन्यप्राण्यांच्या विविध हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वनविभागाला मंजूर करण्यात आले आहे. मात्र या ड्रोन कॅमेऱ्यांची खरेदी निविदा प्रक्रियेत अडकली आहे. त्यामुळे वनक्षेत्राच्या सुरक्षा आणि देखरेख प्रक्रिया सुधारण्यास दिरंगाई होत असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेकडो हेक्‍टरवर पसरलेल्या वनपरिक्षेत्रावर देखरेख करण्यासाठी तसेच या परिक्षेत्रातील प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाला ड्रोन आणि पीटीझेड कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये सुपे, रेहकुरी आणि भीमाशंकर या अभयारण्यासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन ड्रोन कॅमेरे तर माळढोक सर्वेक्षणासाठी दोन ड्रोन कॅमेऱ्यांची मंजुरी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त भीमाशंकर आणि माळढोक सर्वेक्षणासाठी प्रत्येकी दोन पीटीझेड कॅमेरे मंजूर करण्यात आले आहेत. मात्र ही साधने विभागाच्या ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध नसल्याने बाहेरील कंपनीकडून खरेदी केली जाणार आहेत. यासाठी या खरेदीची निविदा काढाव्या लागणार आहेत. मात्र, अजून ही प्रक्रियाच पूर्ण न झाल्याने पुढील प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याची माहिती मुख्य वन्यजीव वनसंरक्षक आर. के. वानखेडे यांनी दिली.

वानखेडे म्हणाले, “केवळ वनांचे संरक्षणच नव्हे, तर इको टुरिझमच्या विकासासाठी देखील या कॅमेऱ्यांचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अनेकदा वन्यजीव संरक्षित प्रदेशात नागरिकांना वन्यजीवांचे दर्शन होत नाही. झालेच, तरी ते ओझरते अथवा काही क्षणांपुरते मर्यादित असते. अशावेळी ड्रोन आणि कॅमेऱ्यांच्या सहाय्याने विविध भागांमधील प्राण्यांच्या हालचाली टिपून ते विभागाच्या केंद्रातून पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध केले जातील. यामुळे नागरिकांनाही ते प्राणी पाहण्याचे आनंद लुटता येईल. तसेच याद्वारे प्राण्यांच्या सुरक्षेवरही त्याचा चांगला परिणाम दिसेल. त्यामुळे लवकरच ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून कॅमेरांची खरेदी केली जाईल.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)