निविदा न काढल्याने उत्पन्नात होणार नुकसान

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेस, साधे बसशेडस, पुणे पॅटर्न बसशेडसवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र, जाहिरातीसाठी अंतिम निविदा काढण्यात न आल्यामुळे प्रशासनाच्या उत्पन्नात नुकसान होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

शहरात विविध भागांत धावणाऱ्या महामंडळाच्या बसेस, बसशेड, तसेच विविध माध्यमातून आणि जाहिरातीतून आर्थिक उत्पन्न मिळविले जाते. विशेषतः साधे बसशेडस, पुणे पॅटर्न बसशेडस, स्टेनलेस स्टिल बसशेडस, बीआरटी बसशेल्टर्स, होर्डिग्ज, बसस्थानके, लॉलीपॉप पीलर्स यांचा समावेश असतो. त्यासाठी प्रशासनाकडून जाहिरात माध्यमांसाठी निविदा करण्यात आली होती. मात्र, ही निविदा अंतिम झालेली नसल्यामुळे महामंडळाच्या आर्थिक नफ्यावर परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. अंतिम निविदा नसल्यामुळे माध्यमांसाठी कोणीही अधिकृत जाहिरातदाराची नेमणूक झालेली नाही. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)