निवासी झोन बदलाचे चार्जेस 5 टक्‍के करा

कोरेगाव भीमा – निवासी झोन बदलाचे चार्जेस 5 टक्के करा, या मागणी संदर्भात पुणे जिल्हा विकास मंचाच्या शिष्टमंडळाचे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांना निवेदन देण्यात आले. पीएमआरडीए हद्दीध्ये समाविष्ट असलेल्या गावांचा विकास सर्व समावेशक पध्दतीने व्हावा, याकरीता पुणे जिल्हा विकास मंचाच्या शिष्टमंडळाने पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांची भेट घेऊन प्रिमियम दर 30 टक्के वरुन 5 टक्के करण्याची आग्रही मागणी केली. तसेच रिंगरोडच्या लगत त्वरीत झोनींग करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले. त्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी पुणे जिल्हा विकास मंचाचे अध्यक्ष सदाशिव आण्णा पवार, डॉ.ज्ञानेश्वर मंडलिक, राजेंद्र दणके, श्रीपतराव नवले, चंपालाल सुराणा, रुपेश बेद्रे, विलास तापकीर, ऍड. राजुरकर, रुपेश शिवले उपस्थित होते. आयुक्तांनी मंचाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)