निवासी गृहप्रकल्पांना पर्यावरण परवानगीची गरज नाही

पर्यावरणपूरक अटी तपासण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर


50 हजार चौरस मीटर क्षेत्रातील बांधकामासाठी अट शिथील

पुणे – 50 हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना पर्यावरण परवानगी घेण्याची अटच केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने काढून टाकली आहे. तसेच या मर्यादांच्या आतील बांधकामांवर पर्यावरणपूरक अटींचे पालन केले जाते की नाही, याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविली आहे.

20 हजार ते 50 हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखल देण्याची जबाबदारी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांवर टाकली होती. त्याबाबतचे आदेश मागील आठवड्यात केंद्र सरकारने काढले होते. मात्र, या आदेशात अनेक त्रुटी असल्याचे लक्षात आल्यानंतर पर्यावरण मंत्रालयाने शुक्रवारी (दि.15)पुन्हा नव्याने आदेश काढले आहेत. त्यामध्ये 50 हजार चौरस मीटरपर्यंतच्या गृहप्रकल्पांना पर्यावरण दाखला घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी 50 हजार चौरस मीटरच्या आतील बांधकामांचे आराखडे मंजूर करतानाच त्यामध्ये पर्यावरणाशी संबंधित अटींची पूर्तता करण्याचे बंधन बांधकाम व्यावसायिकांना घालावे. तसेच बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाचा दाखल देताना या अटींचे पालन केले आहे की नाही, यांची तपासणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी, असे बंधन घातले आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

-Ads-

पूर्वी 20 हजार चौरस मीटर ते दीड लाख चौरस मीटरपर्यंतच्या रग्णालय, शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांना बांधकाम करताना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पर्यावरण दाखल घेण्याची अट होती. नव्या आदेशात दीड लाख चौरस मीटरपर्यंतच्या अशा प्रकल्पांसाठीच्या बांधकामांना पर्यावरण दाखल घेण्याची अट काढून टाकली आहे. त्यामुळे त्यांनाही दिलासा मिळाला आहे

या अटींची करावी लागणार पूर्तता
– 80 चौरस मीटर क्षेत्रासाठी एक झाड लावणे आवश्‍यक
– प्रकल्पामध्ये झाडे तोडावी लागत असेल, त्याच्या मोबदल्यात तीन झाडे लावणे.
– बांधकामादरम्यान हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपयोजना
– बांधकामासाठी खोदाई करताना सुपीक माती प्रकल्पातील लॅन्डस्केपसाठी वापरणे आवश्‍यक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)