निवडणूक व्यवस्थापन सहकार्यासाठी सहा देशांशी करणार करार

नवी दिल्ली -निवडणूक व्यवस्थापनातील सहकार्यासाठी भारत सहा देशांशी करार करणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडाने मंजुरी दिली.

म्यानमार, भूतान, अफगाणिस्तान, अल्बानिया, ईक्वाडोर आणि गिनी या देशांशी संबंधित करार केले जाणार आहेत. तांत्रिक सहकार्यात वाढ करण्याच्या आणि निवडणूक व्यवस्थापन यंत्रणांच्या क्षमतांना पाठिंबा देण्याच्या उद्देशातून या करारांना महत्व आहे.

इतर देशांचे सहकार्य घेतल्याने निवडणूक व्यवस्थापनाला अधिक बळकटी येईल, अशी निवडणूक आयोगाची भूमिका आहे. त्यातून या क्षेत्रातील सहकार्यासाठीचा प्रस्ताव आयोगाने केंद्र सरकारकडे दिला होता. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)