निवडणूक लोकसभेची अन्‌ प्रश्‍न विधानसभेचे?

भोसरी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भोसरीत सध्या जोरदार फ्लेक्‍सयुद्ध रंगले आहे. खासदार शिवाजीराव आढळरावांच्या विरोधांत वातावरण निर्मितीकरीता माजी आमदार विलास लांडेही एकापेक्षा एक फ्लेक्‍स उभे करत असून सध्या लांडे यांच्या फ्लेक्‍सबाजीवरून तिरकस चर्चा रंगली आहे. लोकसभेची निवडणूक असताना फ्लेक्‍सवर विधानसभेशी अन्‌ राज्य शासनाशी संबंधित प्रश्‍न उपस्थित केल्याने फ्लेक्‍सचे हसे झाले आहे.

निवडणुका कोणत्या लागणार? जनतेचे नेमके प्रश्‍न कोणते? याच्याशी दुरान्वये संबंध नसलेल्या फ्लेक्‍सवरील मजकुरामुळे शहाणीसुरती मंडळी गोंधळात अन्‌ चक्रावत आहेत. उरली सुरली गोरगरीब जनता असं होय म्हणून चर्चा करीत आहे. जनता अडाणी आहे असे नेहमीच गृहीत धरणाऱ्या राजकीय मंडळींनी केलेल्या फ्लेक्‍सबाजीवरून भोसरी विधानसभा मतदारसंघात मात्र भलतीच चर्चा रंगली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा निवडणुकीचे वातावरण सध्या तापू लागले आहे. शिवसेनेकडून खासदार शिवाजीराव आढळराव यांना उमेदवारी निश्‍चित समजली जात असून राष्ट्रवादीकडूनही माजी आमदार विलास लांडे यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे लांडे यांचीही उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. वातावरण निर्मितीसाठी खासदार आढळराव आणि माजी आमदार विलास लांडे या लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांमध्ये सध्या फ्लेक्‍स युद्ध रंगले आहे. भोसरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून लांडे यांनी फ्लेक्‍स लावल्यानंतर आता आढळराव यांनीही फ्लेक्‍स लावले आहेत. एकमेकांवर टीका टिपण्णी करण्याच्या नादात फ्लेक्‍सबाजीतील मजकूर मात्र हास्यास्पद झाला आहे.

विलास लांडे यांनी लावलेल्या फ्लेक्‍समध्ये खासदारसाहेब निवडणुकीपुरते दिसता, लघुउद्योजकांची वीज खासदारसाहेब आपण का महाग केली? असे व यासह अनेक प्रश्‍न जे नागरिकांच्या संबंधित नाहीत अथवा लोकसभेशी त्यांचा काहीच संबंध नाही, ते विचारले आहेत. विधानसभेशी निगडीत अनेक प्रश्‍न विलास लांडे यांनी फ्लेक्‍सवर उपस्थित केल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे.

राज्यात सत्ता शिवसेनेची – विलास लांडे
राज्यात शिवसेना आणि भाजपाची सत्ता असल्यामुळे आपण विधानसभेशी निगडीत प्रश्‍न आपण उपस्थित केल्याचे विलास लांडे यांनी सांगितले. शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरुर मतदारसंघातील छोटे-छोटे प्रश्‍नही सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. ते केवळ निवडणुकीपुरतचे लोकांच्या समोर येत असल्याचेही लांडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)