दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाळा
नवी दिल्ली – एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार तेथील रहिवासी असण्याची गरज नाही, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला.

ओडिशातील कटकचे रहिवासी असणाऱ्या समरेंद्र बेऊरा यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी ओडिशातील केंद्रापडा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. मात्र, संबंधित मागणी करणारी व्यक्ती कटकची रहिवासी असल्याचा आक्षेप लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडूून घेण्यात आला. त्यावर न्यायालयाने याचिकाकर्ता निवडणूक लढवू शकतो, असे स्पष्ट केले.

अनेक खासदार दिल्लीत राहतात. मात्र, ते देशाच्या सर्व भागांतून निवडणूक लढवतात, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. बैजयंत पांडा यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने लोकसभेची केंद्रापडा जागा रिक्त झाली आहे. ओडिशातील सत्तारूढ बिजू जनता दलाच्या (बिजद) नेतृत्वाशी पांडा यांचे मतभेद झाले. त्यामुळे बिजदने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यातून पांडा यांनी खासदारकी सोडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)