निवडणूक प्रचाराच्या वर्षात राजकीय चित्रपटांचीही रणधुमाळी 

नवी दिल्ली – निवडणूक प्रचाराच्या वर्षात राजकीय चित्रपटांचीही रणधुमाळी सुरू झालेली आहे. सन 2019 हे वर्ष लोकसभा निवडणुकीचे वर्ष आहे. त्या दृष्टीने रणनीती आखून प्रचाराला सुरुवात ही झालेली आहे. एक दोन नव्हे, तर चार राजकीय चित्रपट प्रदर्शित होत असून आणखी दोन राजकीय चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे.

उरी : सर्जिकल स्ट्राईक, ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर, ठाकरे आणि ताश्‍कंद फाईल्स असे चार राजकीय चित्रपट एकामागून एक प्रदर्शित होत आहेत. एका दृष्टीने हे प्रचाराचे नवीन माध्यम बनू पाहत आहे, असे म्हणायला हरकत नाही. या चार चित्रपटांशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर दोन चित्रपटांची घोषणा झालेली आहे. रोनी स्क्रूवालाचा उरी-द सर्जिकल स्ट्राईक शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. सप्टेंबर 2016 च्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित या चित्रपटाचा विकी कौशल नायक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आहे. मनमोहन सिंह यांच्या माजी माध्यम सल्लागाराने लिहिलेल्या द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकावर ते आधारित आहे. यात मनमोहन सिंह यांची भूमिका अनुपम खेर यांनी केली आहे. एका कुटुंबाने दहा वर्षे देशाला कसे ओलीस धरले होते, त्याची ही मनोधेधक कथा असल्याचे भाजपाने म्हटले आहे. आणि चित्रपटचा ट्रेलर आपल्या ट्विटरवर टाकला आहे.

ठाकरे हा चित्रपट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित आहे. संजय राऊत यांनी त्याची निर्मिती केली असून नवाजुद्दिन सिद्दिकी बाळासाहेबांच्या भूमिकेत आहेत. द ताश्‍कंद फाईल्स हा चौथा चित्रपट भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या ताश्‍कंद येथे झालेल्या गूढ मृत्यूबाबत आहे. भाजपा सपोर्टर विवेक अग्निहोत्री यांनी त्याची निर्मिती केली आहे. एकूणच यावेळच्या निवडणूक प्रचाराला रुपेरी पडद्याच्या झगमगाटाची साथ लाभणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)