निवडणूक जिंकण्यासाठी राम किंवा अल्ला मदत करणार नाही- फारुख अब्दुल्ला

नवी दिल्ली: भाजप खासदार राकेश सिन्हा यांनी राम मंदिर उभारणी संदर्भात हिवाळी अधिवेशनात खाजगी विधेयक आणण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. मतदान करायला राम किंवा अल्ला येणार नाहीत. जनताच सरकार निवडून देणार आहे. २०१९ मध्ये प्रभू रामाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकू असं त्यांना वाटतंय. पण निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना राम मदत करणार नाही. राम किंवा अल्ला मतदान करायला येणार नाही, हे लक्षात घ्यावे असेही त्यांनी भाजपला बजावले आहे.

राकेश सिंह यांनी ट्विट करत म्हंटले, आरआरएस आणि भाजपला राम मंदिर बनवण्याची तारीख सातत्याने विचारणाऱ्यांना माझा एक सरळ प्रश्न आहे कि जर मी खाजगी सदस्य विधेयक आणले तर ते माझ्या विधेयकाचे समर्थन करतील का?, असा प्रश्न त्यांनी विरोधी पक्षांना विचारला असून त्या ट्विटमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, लालू प्रसाद यादव आणि चंद्राबाबू नायडू यांना टॅग केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)