निवडणूक आयोग मतदार ओळखपत्राविषयी घेणार ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली : मतदार कार्ड आधार कार्डसोबत जोडण्याचा विचार आहे. मात्र, आधार कार्ड अनिवार्य करण्याची गरज नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.

नव्या तंत्रज्ञानासोबत जपून पावले टाकण्याची गरज आहे. यासंदर्भात आम्ही माहिती गोळा करत असून, त्यातून कोणत्याप्रकारचा धोका उदभवू शकतो, तसेच त्याला कसे रोखता येईल याबाबची चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात येईल. या संदर्भात आम्ही मतदारांना माहिती देणे सुरू ठेवू.  तसेच सोशल मीडिया धोरणही कायम राहणार आहे, असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. फेसबूकवरून झालेल्या डाटाचोरी प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपले मत मांडले. त्यावेळी त्यांनी मतदार कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्याचा मुद्दा मांडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)