निवडणूकीतील दारू, मटणाच्या पार्ट्यांना बसणार चाप

राज्य निवडणूक आयोगाने कंबर कसली


प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्यक्ष निवडणुकीऐवजी प्रभाग रचनेच्या कार्यवाहीपासून

मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चालणाऱ्या गैरप्रकरांना आळा घालण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष तसेच उमेदवाराकडून पैशांचा मुक्त वापर केला जातो.

मतदारांना आर्थिक तसेच मद्याचे आमीष दाखवले जाते. अनेक ठिकाणी मद्याच्या पार्ट्यांसोबत चिकन, मटणाच्या जेवणावळी आयोजित केल्या जातात. या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात व्हाव्यात म्हणून सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना या प्रत्यक्ष निवडणुकीऐवजी प्रभाग रचनेच्या कार्यवाहीपासून राबविण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया ही कर्तव्यदक्ष आणि निष्पक्ष अधिकाऱ्यांकडून हाताळण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी दिली.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्यात यावी म्हणून आयोगाने 31 जुलै 2018 रोजी आदेश निर्गमित केला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपण्याच्या तारखेस सध्याच्या पदावर तीन वर्ष पूर्ण होत असलेल्या अधिकाऱ्यास निवडणुकीची कामे देऊ नयेत. निवडणूक हाताळणाऱ्या अधिकाऱ्याची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यापर्यंत सध्याच्या पदावरून बदली करू नये किंवा त्याला कार्यमुक्त करू नये.

निवडणूक होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा संबंधित अधिकारी हा जिल्ह्याचा रहिवाशी असू नये. मात्र, हा निकष जिल्हा संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बंधनकारक राहणार नाही, अशा सूचना आयोगाने दिल्याचे सहारिया यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रमुख्याने प्रभाग रचना, विधानसभा मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन आणि प्रत्यक्ष निवडणुका असे तीन प्रमुख टप्पे असतात. आतापर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यापासून राबविल्या जात होत्या. आता त्यात बदल करून त्याबाबत स्वतंत्र आदेश देण्यात आल्याचे सहारिया यांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)