निवडणूका बॅलेट पेपरव्दारेच झाल्या पाहिजेत

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सातारा,दि.28 प्रतिनिधी- आगामी निवडणूकांमध्ये ईव्हीएम मशिनचा वापर बंद करून निवडणूका बॅलेट पेपरव्दारेच झाल्या पाहिजेत, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
संपुर्ण जगात बॅलेट पेपरव्दारे मतदान घेतले जात असताना भारतातच ईव्हीएम हट्ट कशासाठी ? असा सवाल रामदास कांबळे यांनी उपस्थित केला आहे. ईव्हीएम हे मानवनिर्मित असल्यामुळे त्यामध्ये हॅकींगचा धोका कायम आहे. तर भारत देश संविधानावर चालत असताना ईव्हीएमसारख्या अस्त्राचा वापर करून संविधान संपविण्याचे षडयंत्र रचलण्यात आले आहे. लोकशाही टिकविण्यासाठी निवडणूका ह्या राज्यघटनेचा आत्मा असून ती लोकशाहीतील महत्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे निवडणूकीची प्रक्रिया खुली, पारदर्शक, न्याय आणि विश्‍वासार्ह असावी यासाठी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीमध्ये ईव्हीएमचा वापर टाळून बॅलेट पेपरवरच मतदान घेवून लोकशाही अबाधित ठेवण्यात यावी. या मागणीवर सरकार व निवडणूक आयोगाने गांभिर्याने विचार करावा, अन्यथा येत्या काही दिवसांमध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रामदास कांबळे यांनी यावेळी दिला. त्यावेळी युथचे जिल्हाध्यक्ष आबा वाघमारे, बापू लांडगे, स्वप्निल रोकडे, इम्रान आतार, अमृत बुक्कल, अक्षय साळवे, जयसिंग गोखले, बंटी कांबळे, शिवप्रसाद बामणे, प्रतिक रोकडे, ऋषिकेष वन्ने, स्वप्निल निकाळजे, विजय खुडे, नितीन मोहिते, शिवाजी गायकवाड, अक्षय जोगदंड, अविनाश सावंत, केतन येळे, बाबु वैरागे, विशाल पवार, विलास पवार, सुनिल जगताप, शिवाजी भोईटे, सागर कदम, सागर सकट, नजीर पटेल, सुमीत खरात, विकास गाडे, यश सुर्वे, संदीप सुर्वे, दिपक कांबळे, जितेंद्र बनसोडे, सुनिता बल्लाळ, शारदा गायकवाड, विद्या जगदाळे, र.सु.गायकवाड, पंतगराव बनसोडे, अतुल गाडे, जबीता बगाडे, अमित मोरे, तेजस दोरके, मोनिश कांबळे आदी. पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
8 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)