‘निवडणूका जिंकण्यासाठी भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांना वीज दिली’

ज्यांना ऊर्जा क्षेत्रातील काही कळत नाही अशा व्यक्तींकडे ऊर्जा विभागाची जबाबदारी

मुंबई: “ज्यांना ऊर्जा क्षेत्रातील काही कळत नाही अशा व्यक्तींकडे ऊर्जा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली असून सल्लागार विश्वास पाठक आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची त्वरित हकालपट्टी करावी, नाहीतर ते ऊर्जा विभागाचे आणखी नुकसान करतील, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

-Ads-

नवाब मलिक म्हणाले, राज्यात १२ तास लोडशेडिंग आहे. सरकारने लोडशेडिंग जाहीर करावे. मात्र तसे न करता अघोषित लोडशेडिंग करत आहे. ९ तारखेला उर्जा खात्याने नोट तयार केली आहे. त्यात ऊर्जेची मागणी २० टक्क्यांनी वाढली आहे आणि ३००० मेगावॅट वीजेची भीषणता जाणवत आहे.

ऊर्जामंत्री म्हणतात कोळशाचा तुटवडा नाही, मग वीज का मिळत नाही? देशात कोळशाचा तुटवडा आहे, हे सरकारने मान्य करावे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांना महाराष्ट्राची वीज दिली. तिथे निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने हा डाव केला, याचा भुर्दंड इथे जनतेला भोगावा लागतोय.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)