निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांवर दबावप्रकरणी महादेव जानकरांची निर्दोष मुक्तता

गडचिरोली : देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत निर्णय अधिकाऱ्यांवर फोनवरुन चिन्ह देण्यास दबाव टाकल्याच्या प्रकरणात पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांना दिलासा मिळाला असून. वडसा देसाईगंज न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी जानकरांची निर्दोष मुक्तता केली.

देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवडणूक चिन्हासंदर्भात फोनवरुन दबाव आणल्याबाबतचा महादेव जानकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर जानकरांवर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातून न्यायाधिश के आर सिघेल यांनी सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली. माजी नगराध्यक्ष जेसाभाई मोटवानी हेही जानकरांबरोबर निर्दोष सुटले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)