निवडणुकीशी संबंधीत गुन्हे दखल पात्र करण्याची मागणी फेटाळली

नवी दिल्ली – मतदारांना लाच देणे, खोटी विधाने करणे, दिशाभुल करून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे या अनुषंगाने निवडणूक काळात दाखल होंणारे गुन्हे दखल पात्र करून या गुन्ह्यांना कमीतकमी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा करणारी तरतूद केली जावी अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

सर्वोच्च न्यालयातील एक वकिल अश्‍विनकुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती ती दाखल करून घेण्यासच सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नकार दिला आहे.

-Ads-

त्यांनी या याचिकेत नमूद केले आहे की सन 2000 सालापासून देशातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार वाढले आहेत. मतदारांना प्रलोभने दाखवण्याबरोबरच मतदारांची दिशाभुल करणारा खोटा प्रचारही केला जात आहे. यावरून आचार संहिता भंगाचे अनेक गुन्हे दाखल होतात पण प्रत्यक्षात असे प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात कोणतीही प्रभावी कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे.

त्यामुळे या विषयी कायद्यातच बदल करून हे गुन्हे दखल पात्र करण्यात यावेत आणि आगामी सर्व निवडणुकांमध्ये तसा कायदा लागू करावा अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली होती. खुद्द निवडणूक आयोगानेच सन 2012 साली गृहमंत्रालयाला अशी कायदेशीर तूरतूद करण्याची शिफारस केली होती असा दाखलाही याचिकाकर्त्यांनी दिला होता.

तथापी त्यावर सरकारने काहीही उपाययोजना केली नाही असे त्यांचे म्हणणे होते. न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पण त्यावर कोणताही आदेश देण्यास नकार देत त्यांची ही याचिका निकाली काढली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)