निवडणुकीविषयी तुम्हीच निर्णय घ्या ! भाजपची आडवाणी, जोशी यांना सुचना

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी हे लोकसभेची पुन्हा निवडणूक लढवणार का आणि पक्ष त्यांना तिकीट देणार का असे प्रश्‍न उपस्थित होत असतानाच भारतीय जनता पक्षाने या ज्येष्ठ नेत्यांना तुमच्या निवडणुकीविषयी तुम्हीच निर्णय घ्या असे त्यांना सुचवले आहे अशी माहिती पक्षाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. 75 वर्षांपुढील वयाच्या नेत्यांना यापुढे कोणतीही पदे दिली जाणार नाहींत असे पक्षाचे धोरण कायम असल्याचेही पक्षाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या काळात आडवाणी आणि जोशी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना पक्षाने अडगळीत टाकल्यासारखी स्थिती होती. त्यांच्यावर कोणतीच जबाबदारी सोपवण्यात आलेली नव्हती तसेच निर्णय प्रक्रियेतूनही या नेत्यांना बाद करण्यात आले होते त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाची उमेदवारी तरी मिळेल काय असा प्रश्‍न उपस्थित होत असतानाच पक्षाने त्यांनाच त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार देऊन या विषयावरून निर्माण होणारे वादंग टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज आडवाणी हे 91 वर्षांचे व मुरली मनोहर जोशी हे 84 वर्षांचे आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमा भारती आणि सुषमा स्वराज या दोन ज्येष्ठ नेत्यांनी आम्ही निवडणूक लढवणार नसल्याचे या आधीच स्पष्ट केले आहे. त्यासाठी त्यांनी प्रकृतीचे कारण दिले आहे. पण जोशी आणि आडवाणी यांनी मात्र आपली निवडणुकीविषयीची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. ती त्यांनी लवकर स्पष्ट करावी यासाठीच पक्षाने त्यांना त्यांचा निर्णय मागितला आहे असे सांगण्यात येते. दरम्यान कॉंग्रेसने उत्तरप्रदेशात प्रियांका गांधी यांनी रिंगणात उतरवून तेथील राजकारणात आक्रमक भूमिका घेतली असल्याने उत्तरप्रदेशातील नेते असलेले मुरली मनोहर जोशी आणि कालराज मिश्रा यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी देऊन त्यांच्या अनुभवाचा तेथे वापर करून घ्यावा अशी अपेक्षा पक्षाच्या काही नेत्यांनी व्यक्‍त असल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)