निवडणुकीपूर्वी तेल कंपन्यांची तिजोरी भरण्यासाठीच इंधन दरवाढ!

File Photo

राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र
मुंबई – आगामी चार राज्यातील विधानसभा निवडणुकींपूर्वी तेल कंपन्यांची तिजोरी भरण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलची सातत्याने दरवाढ करीत आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हेच दर पुन्हा थोडेफार कमी करून आम्ही लोकहिताची किती काळजी घेतो, असा आव केंद्र सरकारकडून आणला जाईल, असे टिकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोदी सरकारवर सोडले.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसंदर्भात विखे-पाटील यांनी आज सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, डिसेंबरमध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम या चार राज्यांच्या निवडणुका आहेत. निवडणुकीच्या काळात दरवाढ झाल्यास जनमत विरोधात जाण्याची भीती असल्याने सरकार आताच पेट्रोल-डिझेलची दरवाढ करून पैसा गोळा करते आहे. नंतर निवडणुकीच्या काळात हेच दर कमी करून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे दरकपात करून आम्ही किती लोकहिताची काळजी घेतो, असा आव आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका सोसावा लागत असल्याने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर कमी करण्याची मागणी संपूर्ण देशातून केली जाते आहे. परंतु, केंद्र सरकार उत्पादन शुल्क कमी करायला तयार नाही. त्याऐवजी ते राज्य सरकारांना मूल्यवर्धीत कर कमी करण्याचे आवाहन करतात. महाराष्ट्रात तर भाजपचेच सरकार आहे. तरी ते आपल्याच केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायला तयार नाहीत. पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत भाजप-शिवसेनेकडून देशाची फसवणूक होत असून, पुढील निवडणुकीत ग्राहक यांना माफ करणार नाहीत, असा सूचक इशाराही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)