निवडणुकीत कोण कोणाला आडवे करते ते बघूच

खा.उदयनराजे यांनी थोपटले दंड
मुंबई : अनेक जण म्हणाले उदयनराजे नको कुणीही चालेल, अगदी मला आडवे करायचे चाललय. कोण कुणाला आडवे करते ते बघूच , असे सांगत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी निवडणुकीसाठी दंड थोपाटले आहेत. तसेच कुणाला वाटत असेल की, मी उदयनराजेंपेक्षा जास्त मतांनी निवडून येईन ; त्याने आकडे दाखवावे. मी त्याच्या प्रचाराचे काम करेन असे जाहीर आव्हानच विरोधकांना खा. उदयनराजेंनी केले.दरम्यान, राजे कुटुंबातील जे लोक लोकांबरोबर राहिले त्यांनाच लोकांनी स्वीकारले. मात्र जे जनतेत मिसळले नाहीत त्याच्याकडे लोकांनी पाठ फिरवली असे सांगत खा. उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजेंचं नाव न घेता टोला लगावला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. खा.उदयनराजे यांना साताऱ्यात त्यांना पक्षातूनही विरोध होतोय. त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जाते.
खा.उदयनराजेंनी या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले. कामानिमित्त मी मंत्रालयात येत असतो. त्यासाठी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याच्या भेटी घेत असतो. आज काही कामाचे उद्‌घाटन आणि भूमिपूजनाबाबत चर्चा झाली, मतदारसंघातील कामाबाबत चर्चा झाली असे उदयनराजेंनी सांगितले.
तसेच लोकशाहीत इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय पुढे जाता येत नाही, त्यामुळे अनेकांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते माझा त्याला विरोध नाही असेही उदयनराजे म्हणाले.आजचे मंत्री; आमदार नसल्यापासून माझे मित्र आहेत.लोकांचा पाठिंबा याला मी खासदार पदापेक्षा जास्त महत्त्व देतो. कुणाला वाटत असेल की मी उदयनराजे पेक्षा जास्त मतांनी निवडून येईन त्याने आकडे दाखवावे मी त्याच्या प्रचाराचे काम करेन असेही उदयनराजेंनी जाहीर केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)