निवडणुकीच्या तारखा फोडण्याच्या नादात भाजप तोंडघशी

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मात्र निवडणूक आयोगाने घोषणा करण्यापूर्वीच भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी तारीख जाहीर केली.परंतु, हे करण्याच्या नादात ते चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

12 मे रोजी मतदान, तर 18 मे रोजी मतमोजणी होईल, असे ट्वीट अमित मालवीय यांनी केले. मात्र काही क्षणातच निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली. त्यानुसार 12 मे रोजी मतदान, तर 15 मे रोजी मतमोजणी होणार आहे. हे लक्षात येताच अमित मालवीय यांनी ट्वीट डिलीट केले. दरम्यान, निवडणूक आयोगाने यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. निवडणूक आयोगाच्या अगोदर भाजपकडे तारीख कशी, असा प्रश्न विचारला असता चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

निवडणूक आयोगापूर्वीच तारीख जाहीर करणाऱ्या अमित मालवीयांना ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यांनी काहींच्या ट्वीटला उत्तरही दिलं. मात्र आपण एका वृत्तवाहिनीवरील माहिती पहिली आणि ट्वीट केले असल्याच्या दावा अमित मालवीय यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)