निवडणुकीचे पावित्र्य राखण्यासाठी पाडव्याला राष्ट्रनिर्माण बिंदू पूजन

नगर: निवडणुकीचे पावित्र्य राखण्यासाठी व चारित्र्यसंपन्न उमेदवार निवडून येण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने गुरुवार दि.8 नोव्हेंबरला पाडव्याच्या मुहुर्तावर हुतात्मा स्मारकात राष्ट्रनिर्माण बिंदू पूजन केले जाणार आहे. संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ पाडवा साजरा केला जात असताना ही आगळी-वेगळी संकल्पना मतदारांपुढे नेण्यात येणार असल्याची माहिती ऍड.कारभारी गवळी यांनी दिली.

मतदान केंद्रात मतदानासाठी आलेल्या नागरिकांच्या बोटाला शाई लावली जाते. स्त्रीया कपाळाला कुंकू लाऊन सौभाग्यवतीचे पालन करीत असते. भागवत धर्मात कपाळाला बुक्का तसेच ईस्लाम धर्मात डोक्‍यावर टोपी घालून सामाजिक पावित्र्य पाळले जाते. मानस शास्त्रज्ञ डॉ.कार्ल जंग याने प्रतिक शास्त्राबद्दल अभ्यास करुन जीवनात प्रतिक (चिन्ह) मोठे कार्य करत असल्याचे सिध्द केले आहे. बोटाच्या शाईत पावित्र्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रनिर्माण ध्यानबिंदू पूजन केले जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

मतदान करताना बोटावर लावली जाणारी शाई धर्मिनिरपेक्ष व पावित्र्याचे प्रतिक आहे. ही शाई लावल्यानंतर मतदाराने पुढील पाच वर्षाचा विचार करुन राष्ट्र कर्तव्याने मोठ्या जबाबदारीने आंतरात्म्याशी प्रमाणिक राहून योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे. या मोहिमेसाठी कॉ.बाबा आरगडे, ऍड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, अशोक वाकचौरे, ज्ञानदेव काळे, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल आदी प्रयतक्‍शील आ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)