“निवडणुकीचे काम जबाबदारीने करा’ 

नगर: महापालिकेच्या निवडणूक संदर्भात नियुक्‍त असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन हाताळणे आणि अनुषंगिक बाबींचे प्रशिक्षण रविवारी देण्यात आले. निवडणुकीसाठी प्रत्येक अधिकारी – कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी काळजीपूर्वक आणि गांभीर्याने पार पाडावी, असे निर्देश निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले.

सहकार सभागृहात आयोजित निवडणूक प्रशिक्षणा दरम्यान द्विवेदी बोलत होते.यावेळी निवडणूक निरीक्षक नंदकुमार बेडसे, उपजिल्हानिवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला गाडेकर, जयश्री माळी, वामन कदम, शाहुराज मोरे आदि उपस्थित होते.

द्विवेदी म्हणाले, ईव्हीएम मशीन हाताळण्याबाबत माहिती करुन घ्यावी.आज ईव्हीएम मशीनचे प्रशिक्षण आहे.तेव्हा काही शंका असल्यास त्यांचे निरसन करुन घ्यावे म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आपणास काही अडचण येणार नाही. बेडसे म्हणाले, मतदानाच्या दिवशी सकाळी 7.30 वाजता मतदान सुरु करावे.त्या अगोदर सुरु करु नये. मशीनला जोडणारी कनेक्‍टीव केबल असते ती केबल हलणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदान रांगेत करुन घ्यावे. अंध व अपंग व्यक्‍तींच्या मतदानासाठी सोबत आलेल्या व्यक्‍तींची खात्री करुन घ्यावी. मतदान कक्षाबाहेर गोंधळ होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच मतदान केंद्र परिसरात फक्‍त मतदारच असले पाहिजे असे सांगितले.

आनंदकर म्हणाले, नियुक्‍त असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र सोडून बाहेर जाऊ नये. पोलिंग एजंटांना मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास बंदी आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी. मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रावर पोलिसांच्या सोबतच जावे. पोलीस बरोबर नसतील तर साहित्य घेऊन जाऊ नये. निवडणुकीचे काम ही राष्ट्रीय जबाबदारी आहे. याचे भान प्रत्येक कर्मचाऱ्याने बाळगावे.कोणत्याही दबावाला बळी न पडता सोपविलेली कामगिरी चोखपणे पार पाडावी असे आवाहन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)