निवडणुका लागल्या की, अनेक नेते भाजपा सोडणार- नवाब मलिक

File photo

मुंबई: भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे नाराज आहेत, ही नाराजी त्यांनी पुन्हा बोलून दाखवली आहे. भुसावळमध्ये एका कार्यक्रमात ते म्हणाले की, कोणावरही तो एकाच पक्षामध्ये कायम राहणार असा शिक्का नसतो. त्यामुळे कुणालाही गृहित धरू नये. खडसेंच्या मनातली घालमेलच यातून स्पष्ट होते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर पाठीराखे असलेले रामदेव बाबाही नवीन पंतप्रधान कोण हे सांगता येणार नाही, असं म्हणतायत. नेतेच नव्हे, तर निवडणुका जाहीर होताच अनेक पक्षही भाजपाची साथ सोडतील, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)