निवडणुका झाल्यापासून आम्ही 24 लाख नव्या रोजगारांची निर्मिती केली -ट्रम्प

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र आपण सत्तेवर आल्यापासून म्हणजे गेल्या वर्षभरात 24 लाख रोजगार निर्माण केल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या स्टेट ऑफ युनियन अॅड्रेस या भाषणात त्यांनी ही माहिती जाहीर केली.
डोनल्ड ट्रम्प यांच्या भाषणावेळेस काँग्रेसच्या आत आणि बाहेरही त्यांना मोठा विरोध होत होता. तरीही ट्रम्प आपले भाषण सुरु ठेवले. अमेरिकेचे स्वप्न सत्यात आणण्याची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा दुसरी कोणतीही वेळ चांगली असू शकत नाही. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात करसुधारणा, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास, स्थलांतर नियमसुधारणा, राष्ट्रीय सुरक्षा अनेक विषयांवर मत व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांच्या काळामध्ये सध्या अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. निवडणुका झाल्यापासून आम्ही 24 लाख नव्या रोजगारांची निर्मिती केली तसेच 45 वर्षातील बेकारी इतकी घटण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत. तसेच आजवर आपल्याच जनतेवर अन्याय करणारा असा कोणताच देश नसेल अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी किम जोंग उन यांच्यावर टीका केली. उत्तर कोरियाची अण्वस्त्र स्पर्धा धोकादायक असल्याचे सांगत त्यामुळे उत्तर कोरियालाही धोका असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)