निवडणुका कधी घ्यायच्या हे भाजपच ठरवते वाटते- कॉंग्रेस

नवी दिल्ली : फेसबुक डेटा लीकनंतर आता कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तारखा लीक झाल्याने सध्या राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून आता काँग्रेसने भाजपवर हल्ला चढवला आहे. भाजप आता ‘सुपर इलेक्शन कमिशन’ झाला आहे, अशी तोफ काँग्रेसने डागली आहे. तसेच निवडणुका कधी घ्यायच्या हे आता भाजपच ठरवत आहे हेच यावरून दिसत असल्याचेदेखील काँग्रेसने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू असताना, भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालविय यांनी ट्विटद्वारे कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. दरम्यान, निवडणूक आयोगाने प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, कारवाईचा इशाराही दिला आहे. त्यात आता काँग्रेसनेही भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपला ‘सुपर इलेक्शन कमिशन’ म्हटले आहे. निवडणुकांची तारीख आधीच घोषित करून भाजपने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेलाच आव्हान दिले आहे, असेही ते म्हणाले.  अमित मालवीय यांनी आधीच कर्नाटक निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. याचाच अर्थ निवडणुका कधी घ्यायच्या ते भाजपच ठरवते असे वाटते, असे म्हणत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)