निवडणुका ईव्हीएमनेच होणार निवडणूक आयोगकडून स्पष्ट

नवी दिल्ली: देशातील निवडणुका मतदान पत्रिकांनी होणार नाहीत, तर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटनेच होणार आहे, असे निवडणूक आयोगाने आज पुन्हा ठामपणे सांगितले आहे. अलीकडेच लंडनमधील एका पत्रकार परिषदेत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतातील ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर काही पक्षांनी ईव्हीएमऐवजी मतदान पत्रिकांचा वापर करण्याची मागणी केली.

निवडणुक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले की, “मतपत्रिकेद्वारे मतदान घेऊन आम्ही देशाला काही वर्षे मागे घेऊन जाणार नाही. आगामी निवडणुका या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटद्वारेच होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपण ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरणे सुरुच ठेवणार आहोत. यासाठी राजकीय पक्षांकडून आणि उमेदवारांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्याचवेळी मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याचा आग्रह धरणाऱ्या मागण्यांमुळे घाबरणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

दोनच दिवसांपूर्वी अमेरिकन सायबर एक्‍सपर्ट सय्यद शुजा याने दावा केला होता की, 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी देशातल्या ईव्हीएम मशीन हॅक झाल्या होत्या. याप्रकरणामुळे मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे ही मागणी पुन्हा एकदा मांडण्याची आयती संधी कॉंग्रेसला मिळाली आहे.

सय्यद शुजाच्या खळबळजनक दाव्यानंतर कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी मांडणे सुरु केले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची ईव्हीएमबाबतची ठाम भूमिका विरोधकांचे तोंड बंद करणारी ठरेल, असे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)