निवडणुका आल्या, की यांना राम मंदिर आठवते – शरद पवार 

कोल्हापूर: ज्यांच्या जवळ मुद्दे नसतात ते दरवेळेला निवडणुका आल्या की, राममंदिराचा मुद्दा पुढे करतात, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता पवारांनी टीका केली आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. जनमानसात सरकारबद्दल असंतोष पाहायला मिळत आहे. सध्याच्या राज्यांतील निवडणुकांमधून ते स्पष्ट होईल. महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपविरोधी गटांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे. देशपातळीवर सरकार विरोधी आघाडी उभारत असल्याचे वृत्त निराधार आहे. पण, राज्यात सत्ताधारी भाजप विरोधी गटांना एकत्र आणायचा प्रयत्न असेल. डिसेंबरअखेर मित्रपक्षांची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

राम मंदिराच्या मुद्दावरूनही पवारांनी शिवसेनेसह भाजपवर निशाणा साधला आहे. ज्यांच्या जवळ लोकांना पटेल, भावेल असा कार्यक्रम नाही. ते निवडणुका जवळ आल्यावर कट्टर हिंदुत्वाची भुमिका घेतात. त्याचाच भाग म्हणून देशभरात राम मंदिराचा मुद्दा तापवला जात असल्याचे पवार म्हणाले.

ईव्हीएमद्वारे होणारी मतदान पद्धती सदोष 

दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीबद्दल बोलताना, जागावाटपाबाबत कोणताही वाद नसून 48 पैकी 40 जागांवर एकमत झाले आहे. तसेच, ईव्हीएम मशीन मतदानावेळी बिघडतात. हे घातक असून ईव्हीएमद्वारे होणारी मतदान पद्धती सदोष आहे. याबाबत 10 डिसेंबरच्या बैठकीत चर्चा करणार असून पूर्वीप्रमाणे मतदान घ्यावे, अशी घटक पक्षांच्या बैठकीत मागणी करणार असल्याची माहिती पवारांनी दिली.

 हिंदुत्ववादाचा मुद्दा आणून जनतेची दिशाभूल – शरद पवार 

निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्ववादाचा मुद्दा पुढे करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजपा आणि शिवसेना करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राम मंदिराचा मुद्दा पुन्हा-पुन्हा काढला तर लोकांचा विश्वास बसणार नाही. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असून मराठा आरक्षणाचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत होईल, असे दिवास्वप्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघत आहेत. मात्र या भूलथापांना जनता फसणार नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)