निवडणुका आल्यास भाजपाला राममंदिराची आठवण येते : दिग्विजय सिंह

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मोदी सरकार प्रत्येक बाजूने अपयशी ठरले आहे. त्यांना रामाची केवळ निवडणुकीपूर्वीच आठवण येते. राममंदिर उभारण्यास कोणतीच अडचण नाही. पण वादग्रस्त जागेवरच त्यांना ते मंदिर का उभारायचे आहे? जर वादग्रस्त जमिनीवर त्यांना मंदिर पाहिजे असेल तर न्यायालयाच्या आदेशाचे त्यांना पालन करावेच लागेल.

भाजपा खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. राममंदिरच्या मुद्यावर भाजपाला खिंडीत पकडण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. दरम्यान, दिग्विजय सिंह यांचा मुलगा आणि भावाने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंह हे चांचोडा आणि मुलगा जयवर्धन सिंह हे राघोगड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)