निवडणुका आल्यावर बोंडारवाडी धरण आठवते का?

सातारा – सध्याच्या राजकारणात शब्द पाळणारे नेते कमी आहेत. मात्र, निवडणुका तोडांवर आल्या की, काहींना बोंडारवाडी धरण आठवत आहे. बोंडावरवाडी धरणाचे राजकारण करत आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर आत्तापासूनच ठेकेदारांना घेऊन फिरत आहेत, असा टोला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खा. उदयनराजेंचे नाव न घेता लगावला.

दरम्यान जावली तालुक्‍यासह केळघर परिसरासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राजकीय ताकद देऊन त्यांच्या पक्षनिष्ठेचा यथोचित सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी
दिली. आंबेघर (ता. जावली) येथे आयोजित कार्यक्रमात आ. शिवेंद्रसिहराजे बोलत होते. आ. शिवेंद्रराजे भोसले पुढे म्हणाले, निवडणुका तोडांवर आल्या की, काहीजण बोडांरवाडी धरणाचा प्रश्‍न पुढे करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर आतापासूनच ठेकेदारांना घेऊन फिरत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या धरणासाठी मी सुरुवातीपासूनच आग्रही आहे. कुसूंबी गटातीत सावरी गावचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी मी स्वतः व रांजणे यांनी प्रत्येकी एक-एक लाख रुपये दिले आहेत. कायम जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम करणाऱ्या राष्ट्रवादीशी पाठीशी जनतेने कायम रहावे. यावेळी पांडूरंग जवळ, दत्तात्रय पवार, हरिभाऊ शेलार, संपत शेलार आदिची भाषणे झाली.

सरकार असते तर मागेच बदली
जे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात अपयशी ठरतात. त्यांच्याविरोधात थेट अविश्‍वासाचा ठराव आणून तो मंजूर करण्यात येतो. अशा घटनांची नोंद जिल्हा परिषदेच्या इतिहासात झालेली आहे. मात्र, शिंदे यांची कार्यपध्दती पाहता केवळ संधीची वाट पाहून राष्ट्रवादीने त्यांच्यावर मागेच अविश्‍वासाचा ठराव आणला असता. परंतु आता इतिहासाप्रमाणे राष्ट्रवादी आता केंद्रात व राज्यात कोठेही सत्तेत नाही. त्यामुळेच बहुधा शिंदेंच्या विरोधात अविश्‍वासाचे पाऊल उचलण्याचे धाडस करण्यात आले नसावे.

शिक्षक बदली अन्‌ टॅंकर घोटाळ्याचे काय?
मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी कार्यपध्दतीने पदाधिकाऱ्यांबरोबर अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील धडकी भरवली आहे. शिंदे यांनी हजर होताच, पहिल्यांदा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणात शैक्षणिक दजावरून शिक्षकांची चांगलीच शाळा घेतली. तद्‌नंतर आदर्श अभियंता पुरस्कार वितरण कार्यक्रमात रस्त्यांच्या कामांवरून अभियंत्यांचे बौध्दिक पॅचवर्क करण्याचे काम केले. तर जिल्हा परिषदेत येणाऱ्या शिक्षकांना विद्यालय प्रमुखांची मान्यता घेवून येण्याचे फर्मान काढले होते. तर बदलीसाठी खोटे दाखले देणाऱ्या शिक्षकांच्या चौकशीचे काम हे गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. त्यावर अद्याप शिंदेंकडून निर्णय आलेला नाही ही विशेष बाब म्हणावी लागेल. तर माण तालुक्‍यात टॅंकर घोटाळ्याचा आरोप सर्वसाधारण सभा तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सभेत देखील झाला. त्यामुळे शिक्षक बदली आणि टॅंकर घोटाळ्याप्रकरणी शिंदे काय निर्णय देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)