निवडणुकात हस्तक्षेप करणार नसल्याचे फेसबुककडून लिहून घ्या !

नवी दिल्ली : डेटा लिक प्रकरणानंतर सरकार चांगलेच जागे झाले असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच कि काय आता संसदीय समितीने फेसबुककडून भारताच्या आगामी कोणत्याही निवडणुकीत हस्तक्षेप करणार नाही असे लेखी स्वरूपात घेण्याचे आदेश भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयास दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपचे नेते अनुराग ठाकूर हे या संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, यांनी भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांना फेसबुक आणि अन्य कोणत्याही सोशल मीडियाला देशातील कोणत्याही निवडणुकीत आपला हस्तक्षेप नसणार याची सर्व माहिती लेखी स्वरूपात घेण्यास सांगितले आहे. तसेच फेसबुकसोबत झालेली सर्व बोलणी, प्रश्न आणि उत्तरे सर्वांसमोर सादर करण्याचेही आदेश दिले असल्याचे म्हटले आहे.  एवढेच नाही तर फेसबुक आणि अन्य सोशल मीडियातील दुरुपयोग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कारवाईविषयी माहिती देण्यासही सांगितले असल्याचे म्हटले जात आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)