निवडणुकांसाठी सर्वांनी सज्ज व्हा – राऊत

पुणे – शिवसेना पक्ष हा गोरगरीब आणि सर्वसामान्यांचा आहे. आपल्याकडे साखर कारखाने नसले तरी, साखर कारखाने असणाऱ्यांना पाडायची ताकद आपल्यामध्ये आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी सर्वांनी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले.

खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी (दि. 12) शहरातील आठही विधानसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची विभागवार बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर पुणे महानगर रपालिकेतील नगरसेवकांची बैठकही राऊत यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, महिला अघाडी संपर्कप्रमुख तृष्णा विश्वासराव, नाशिक संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, बारामती लोकसभा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, सहसंपर्कप्रमुख बाळा कदम, शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर यासह पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपले प्रेरणास्थान बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना घराघरात पोहचवा, असे अवाहन शिवसैनिकांना करत राऊत म्हणाले, देशात आणि महाराष्ट्रात आता कोणतीही लाट नाही. असलीच तर ती फक्त शिवसेनेची आहे. त्यामुळेच भाजपचे लोक शिवसेनेच्या मागे फिरत आहे. परंतू, या गोष्टीने हुरळून जावू नका, गाफिल राहू नका. आगामी निवडणूकांमध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचणारा कार्यकर्ताच निवडून येणार आहे. त्यामुळे जनतेशी संपर्क वाढवा. तुमच्या समोर कितीही मोठा पैसेवाला, नेता विरोधक म्हणून उभा राहु द्या. त्याच्या विरोधात लढून विजयी होवू शकता. असा आत्मविश्‍वास स्वतःमध्ये जागृत करा, असा सल्लाही राऊत यांनी यावेळी दिला.

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी घेतली खासदार संजय राऊत यांची भेट
पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या विषयावर खासदार राऊत यांच्याशी चर्चा करुन याबबतचे निवेदनही दिले. असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. भुपेंद्र गोसावी, ऍड. संतोष शितोळे यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)