निवडणुकांत सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी पाऊले

इंदूर – निवडणुकांदरम्यान सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. त्यासाठी निवडणूक आयोग ब्लूप्रिंट तयार करत आहे.

विविध देशांमधील निवडणुकांत सोशल मीडियाच्या माध्यमातून हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला. त्यावरून फेसबुक आणि केंब्रिज ऍनालिटीका या कंपन्या विविध देशांच्या रडारवर आल्या. त्यावरून भारतीय युजर्सच्या डेटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. भारत सरकार आणि निवडणूक आयोगाने हस्तक्षेपाच्या आरोपाची गंभीर दखल घेतली. त्यातून आता सोशल मीडियाच्या गैरवापराला आवर घालण्यासाठी निवडणूक आयोग सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे.

सोशल मीडियासंदर्भात लवकरच आयोगाकडून सूचना जारी केल्या जाणार आहेत. दरम्यान, यापुढील निवडणुकांत इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांचा वापर करण्याची जोरदार मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, ईव्हीएम सुरक्षित असल्याच्या भूमिकेवर आयोग ठाम आहे. व्होटर-व्हेरिफिएबल पेपर ऑडीट ट्रेलच्या (व्हीव्हीपीएटी) माध्यमातून मतदार मत योग्यप्रकारे नोंदल्याची खातरजमा करू शकतो, याकडे आयोग लक्ष वेधत आहे. व्हीव्हीपीएटी हे मशीन ईव्हीएमशी जोडले जाते. त्यातूून मत नोंदवल्याची पावती दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)