निवडक खरेदीमुळे सलग दुसऱ्या दिवशी निर्देशांकात सुधारणा

मुंबई- निर्देशांक कमी पातळीवर असल्यामुळे निवडक खरेदी होऊन सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांक वाढले. बऱ्याच गुंतवणूकदारांना फेडरल रिझर्व्ह इतक्‍यात व्याजदर करणार नाही असे वाटते. मात्र जर व्याजदर वाढ झाली तर बाजारात अस्थिरता निर्माण होण्याची शक्‍यता आहे. बुधावारी बॅंका आणि दूरसंचार कंपन्याच्या शेअरची गुंतवणूकदारांनी खरेदी केली. त्याचबरोबर काल सरकारने साखरेवरील निर्यात शुल्क कमी केल्यामुळे आज साखर उद्योगातील कंपन्याचे शेअर वधारल्याचे दिसून आहे.

बुधवारी बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 139 अंकानी वाढून 33136 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 30 अंकानी वाढून 10155 अंकावर बंद झाला. मंगळवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 344 कोटी रुपयांच्या शेअरची तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 731 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. जर फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढविले आणि आणखी पुढेही वाढविणार असल्याचे सांगीतले तर जागतिक तसेच भारतीय शेयर बाजार निर्देशांकावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रिझर्व्हच्या धोरणानंतरच बाजाराना खऱ्या अर्थाने दिशा मिळू शकणार आहे, असे जिओजी वित्तीय सेवेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)