निवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांकांत भरीव वाढ 

आयएल अँड एफएस कंपनीच्या शेअरच्या भावात 12% वाढ 
बॅंका आणि ग्राहक वस्तू कंपन्या तेजीत; जागतिक परिस्थिती मात्र नकारात्मक 
मुंबई: गेल्या पाच दिवसापासून शेअरबाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे शेअरबाजारात आज काही प्रमाणात निवडक खरेदी झाली. त्यातच अर्थमंत्रालयाने बॅंकांबरोबर चर्चा सुरू केली आहे. शिवाय एलआयसीने आयएल ऍण्ड एफएफ कंपनी कोसळू देणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना काही प्रमाणात धीर आल्याचे वातावरण शेअरबाजारात आहे. मात्र, जागतिक परिस्थिती खराबच आहे. अमेरिकेने अनेक देशाबरोबर भांडण वाढविले आहे. त्यामुळे जागतिक शेअरबाजाराचे निर्देशांक आजही खालच्या पातळीवर होते.
बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 347 अंकांनी म्हणजे 0.66 टक्‍क्‍यांनी उसळून 36652 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 100 अंकांनी वाढून 11067 अंकावर बंद झाला. गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्‍स तब्बल 1785 अंकांनी ढासळल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. गेल्या काही दिवसात झालेल्या विक्रीमुळे बॅंका आणि ग्राहक वस्तू कंपन्यांचे शेअरआकर्षक किमतीवर उपलब्ध असल्याचे दिसून आल्यानंतर गुंतवणूकदारांनी त्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. काल शेअरबाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. त्या परिस्थितीतही देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1527 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली. मात्र, परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 523 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी शेअरबाजारांनी उपलब्ध केली आहे. आज जरी काही प्रमाणात खरेदी झाली असली तरी गुंतवणूकदार जागतिक नकारात्मक परिस्थितीमुळे कमालीचे सावध झाले आहेत. क्रुडचे दर वेगाने वाढत आहेत. त्याचबरोबर रुपयाचे मूल्या कमालीचे अस्थिर आहे.
त्यातच अमेरिका या आठवड्यात व्याजदरात पाव टक्‍क्‍यांनी वाढ करण्याची शक्‍यता असल्यामुळे पुन्हा रुपयाच्या मूल्यावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. या कारणामुळे गुंतवणूकदार कुंपनावर बसून राहण्याची शक्‍यता असल्याचे ब्रोकर्सना वाटते. आजही जागतिक परिस्थिती नकारात्मक असल्यामुळे सकाळी निर्देशांक अस्थिर होते. मात्र, नंतर खरेदी वाढून निर्देशांकांना आधार मिळाले. एलआयसीने दिलेल्या आश्‍वासनानंतर आयएल अँड एफएस या कंपनीच्या शेअरच्या भावात आज तब्बल 12 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. मात्र, डीएचएफएसएलच्या शेअरच्या भावात आजही 23 टक्‍क्‍यांनी घट नोंदली गेल्याचे दिसून आले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)