निवडक खरेदीमुळे निर्देशांकांत अल्प वाढ 

मुंबई – गेल्या काही दिवसापासून निर्देशांकांत मोठी घट झाल्यामुळे काल सकाळी बरीच निवडक खरेदी होऊन निर्देशांकांत वाढ झाली. मात्र नंतर विक्रीही वाढली. तरीही निर्देशांकांत कालच्या तुलनेत थोडी वाढ झाल्याचे दिसून आहे. काल गुंतवणूकदारांनी वाहन, धातू, बॅंकिंग, रिऍल्टी या क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरची खरेदी केली. मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स केवळ 35 अंकानी वाढून 34651 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 20 अंकानी वाढून 10536 अंकांवर बंद झाला. कर्नाटकच्या निवडणुकानंतर गेल्या पाच दिवसात सेन्सेक्‍स 940 अंकानी कमी झाला होता.

स्टेट बॅंकेने चौथ्या तिमाहीत 7718 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे जाहीर केल्यानंतर या बॅंकेच्या शेअरची किमती 5 टक्‍क्‍यापर्यंत वाढल्या. दरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा चालू आहे. काल या गुंतवणूकदारांनी 496 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 496 कोटी रुपयाच्या शेअरी खरेदी केली. स्थूल अर्थव्यवस्था खराब असल्यामुळे आगामी काळातही गुंतवणूकदार सावध राहतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)