निवडक खरेदीमुळे निर्देशांक उसळले

बॅंका तेजीत मात्र माहिती तंत्रज्ञान कंपन्या पिछाडीवर

मुंबई- जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यानंतर भारतीय शेअरबाजारात आज बरीच खरेदी होऊन निर्देशांक उंचावले. रुपया बळकट होत असल्यामुळे निर्देशांकांना मोठा आधार मिळाला. त्याचबरोबर निर्देशांक कमी पातळीवर असल्यामुळे कुंपणावर बसून असलेल्या गुंतवणूकदारांनी आज खरेदी करण्याची संधी साधल्याचे दिसून आले.

मात्र, जागतिक व्यापारयुद्धाची स्थिती कायम असल्यामुळे अजूनही गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करीत असल्याचे दिसून येत आहे. चीन आणि अमेरिकेने गेल्या आठवड्यात परस्पराच्या वस्तूवर आयात शुल्क वाढविण्याच्या धमक्‍या दिल्या होत्या. त्यामुळे जागतिक शेअरबाजारावर परिणाम झाले होते. मात्र दोन्ही देशांनी व्यापार संतुलित करण्यासाठी अनौपचारिक पातळीवर चर्चा सुरू केल्याचे समजले जाते. त्यामुळे जागतिक शेअरबाजारातील गढूळ वातावरण आज थोडे सकारात्मक झाले.

निर्देशांक वाढले असतानाच रुपया बळकट होत असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि इतर निर्यात करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून आले.
सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 469 अंकानी वाढून 33066 अंकावर बंद झाला तर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टीही 132 अंकानी वाढून 10130 अंकावर बंद झाला. 12 मार्चनंतर प्रथमच निर्देशांक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.

गेल्या दोन सत्रांत झालेल्या विक्रीमुळे सन्सेक्‍स 539 अंकानी कमी झाला होता. बॅंका, धातू, वित्तीय कंपन्या, ग्राहक वस्तू, भांडवली, वस्तू, वाहन, सरकारी कंपन्या आणि रिऍल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची आज खरेदी झाल्याचे दिसून आले. बॅंकांचे शेअर तर आज 6.16 टक्‍क्‍यापर्यंत वाढले. सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना मदत करण्याबाबत गंभीर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बॅंकांच्या शेअरची खरेदी झाल्याचे ब्रोकर्सना वाटते.

शुक्रवारच्या व्यवहाराबाबत मिळालेल माहितीनुसार शुक्रवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 1628 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 935 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. रुपया बळकट होत असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर आज 3.96 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)