निवडक खरेदीमुळे निर्देशांक उसळले

आयडीबीआय बॅंकेचा शेअर उसळला
आयडीबीआय बॅंकेचे 51 टक्‍के भागभांडवल एलआयसीकडे जाण्याची शक्‍यता माध्यमात व्यक्‍त केली जात होती. त्यामुळे आज या बॅंकेच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी होऊन शेअरच्या किमती 10 टक्‍क्‍यांनी वाढल्या. यामुळे बॅंकेचे बाजारमूल्य एकाच दिवसात 757 कोटी रुपयांनी वाढून 22954 कोटी रुपयांवर गेले. याबाबत मुंबई शेअरबाजाराने अगोदरच बॅंकेला स्पष्टीकरण मागितले होते. बॅंकेने दुपारी सांगितले की, भागभांडवल एलआयसीला खरेदी करणार आहे, की नाही विषयावर संचालक मंडळात चर्चा झालेली नाही. या संबंधात काही निर्णय घेतल्यास ते शेअरबाजाराला ताबडतोब कळविले जाणार असल्याचे बॅंकेने सांगितले आहे. मात्र, तरीही सायंकाळी इर्डाने एलआयसीला 51 टक्‍के भागभांडवल खरेदी करण्याची परवानगी दिली.

 

मुंबई, काल रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेल्यानंतर आज या चलनाच्या मूल्यात सुधारणा झाली. जुलै डेरिव्हेटीव्हजची सुरुवात आशादायक झाली. त्यामुळे आज निवडक शेअरची जोरदार खरेदी झाल्यामुळे निर्देशांक उसळले. बऱ्याच कालावधीनंतर जागतिक बाजारातही आज तेजीचे वातावरण होते. काही कंपन्याचे शेअर बऱ्याच कमी किमतीवर आल्यामुळेही निवडक खरेदीला चालना मिळाली. तरीही जागतिक बाजारातील परिस्थिती लवचीक आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावध राहण्याची जास्त शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाजार बंद होताना शुक्रवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 385 अंकानी म्हणजे 1.18 टक्‍क्‍यांनी वाढून 35423 अंकांवर बंद झाला. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्‍स 452 अंकांनी कमी झाला होता. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी आज 125 अंकांनी वाढून 10714 अंकावर बंद झाल्याचे दिसून आले.

मात्र, गेल्या पाच दिवसांत निर्देशांकाची बरीच हानी झाली असल्यामुळे आठवड्याच्या पातळीवर निर्देशांक कमी झाले. गेल्या पाच आठवड्यापासून निर्देशांक वाढत होते. या आठवड्यात सेन्सेक्‍स 266 अंकानी म्हणजे 0.75 टक्‍क्‍यांनी कमी झाला. काल झालेल्या व्यवहारानुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 951 कोटी रुपयांच्या शेअरीची विक्री केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 442 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. आता रुपयाच्या मूल्याकडे आणि क्रुडच्या दराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहण्याची शक्‍यता असल्याचे ब्रोकर्सना वाटते. आज झालेल्या खरेदीचा धातू, रिऍल्टी, ऊर्जा क्षेत्राला बराच फायदा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)